विधीज्ञ चेतन पाटील यांची नियुक्ती

ऐरोली : देशातील कोळी समाजाच्या हितासाठी लढणारे 'राष्ट्रीय कोळी महासंघ'चे राज्य प्रदेशाध्यक्ष विधीज्ञ चेतन पाटील यांची नियुक्ती 'अखिल भारतीय कोळी समाज'च्या महाराष्ट्र शाखा युवा अध्यक्षपदी करण्यात आली आहे. 'अखिल भारतीय कोळी समाज'चे राष्ट्रीय युवा अध्यक्ष महेंद्र केसरी यांनी नुकतेच चेतन पाटील यांना नियुक्ती पत्र दिले आहे.

विधीज्ञ चेतन पाटील यांनी राष्ट्रीय कोळी महासंघ आणि भाजप मच्छीमार सेल प्रदेश अध्यक्ष पद सांभाळताना  कोळी समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच राज्यात, देशात आलेल्या अनेक नैसर्गिक वादळामुळे भयभीत झालेल्या कोळी मच्छीमार बांधवांना स्वतःच्या खिशातून मदत केली आहे. याशिवाय   विविध प्रकारचे साहित्य देखील दिले आहे. त्याचबरोबर कोळी बांधवांसाठी शेकडो समाजोपयोगी कामे केली आहेत. त्याची दखल अखिल भारतीय कोळी समाज पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

अखिल भारतीय कोळी समाज, दिल्ली द्वारे विधीज्ञ चेतन पाटील यांच्या सामाजिक कामाचे कौतुक नियुक्ती पत्रात केले आहे. तसेच आपले कोळी समाजाप्रती असलेले प्रेम पाहून आपणास 'अखिल भारतीय कोळी समाज'च्या महाराष्ट्र शाखा युवा अध्यक्षपदी

नियुक्त करताना आनंद होत आहे, असेही  नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. या नियुक्ती बद्दल विधीज्ञ चेतन पाटील यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

दरम्यान, आपण कोळी समाजाच्या प्रगतीसाठी यापुढेही कायमच प्रयत्नशील राहून कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला आहे, अशी प्रतिक्रिया विधीज्ञ चेतन पाटील यांनी नियुक्तीपत्र स्विकारल्यानंतर व्यक्त केली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

जुईनगरवासियांच्या सुरक्षेसाठी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेस आक्रमक