हस्तकलाकारांसाठी वाशीत कार्यक्रम (कार्यशाळा)

नवी मुंबई : वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत डेव्हलपमेंट कमीशनर (हस्तकला) यांच्या मार्फत हस्तकलाकारांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देणारा कार्यक्रम (कार्यशाळा) येत्या शुक्रवार दि. 17 जून 2022 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत वाशी सेक्टर-6 मधील साहित्य मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.  

या कार्यक्रमामध्ये शासकीय अधिकारी हस्तकला-शिवणकाम, भरतकाम, दागिने बनविणे, विणकाम, चामडयाच्या, बांबूच्या, कपडयाच्या वस्तू तयार करणे आदी कलांचा हस्तकलेत समावेश आहे. यामध्ये हस्तकलाकारांसाठी असलेल्या सरकारी योजना, आर्थिक योजनांची माहिती आणि gem पोर्टल नोंदणी, नवीन हस्तकलाकारांची पेहेचान ओळखपत्रांसाठी नोंदणी, सरकारी योजनांची ओळख आणि नोंदणीचे फायदे, हस्तकलाकारांसाठीच्या हेल्पलाईन सेंटरची माहिती (1800-208-4800), हस्तकालाकरांसाठी इतर सरकारी योजनांची माहिती या कार्यक्रमाद्वारे देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा विनाशुल्क असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

वाशीतील के.बी.पी.कॉलेजमध्ये एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण शिबीर