शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन 

पनवेल : कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष जून महिन्यातील शैक्षणिक वर्ष आता सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाईन निबंध स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. 

         इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हि स्पर्धा असून मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही पैकी कोणत्याही भाषेत सहभाग घेता येणार आहे. इयत्ता ८ वी ते १० वी या मोठ्या गटासाठी १ हजार ते १५०० तर इयत्ता ५ वी ते ७ वी या छोट्या गटासाठी ५०० ते ७०० शब्दांची मर्यादा असणार आहे. 'सुट्टीमध्ये मी घालवलेला अविस्मरणीय दिवस', 'ओढ शाळेच्या पहिल्या दिवसाची', 'हो! मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय' हे तीन विषय या स्पर्धेकरिता असून निबंध पाठविण्याची अंतिम तारीख २० जून २०२२ आहे. सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यात येणार असून विजेत्यांना भरघोस बक्षिसांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच निबंध ९९२०७६५७६५ या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

हस्तकलाकारांसाठी वाशीत कार्यक्रम (कार्यशाळा)