महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शिवसेना बेलापूर महिला उपविभाग संघटक पदी शांताताई जाधव
नवी मुंबई : नवी मुंबई मधील बंजारा समाजाच्या नेत्या सौ. शांताताई जाधव यांची शिवसेना बेलापूर महिला उपविभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सहीनिशी असलेले नियुक्ती पत्र शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी सौ. शांताताई जाधव यांना सुपूर्द केले.
शिवसेना बेलापूर महिला उपविभाग संघटक सौ.शांताताई जाधव यांचे समाजकार्य नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापूर पट्टयात मोठया प्रमाणात पसरले असून, त्याचा फायदा शिवसेनेला आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेतृत्वाने माझ्यावर दिलेली जवाबदारी तन, मन, धनाने पार पाडणार असून, शिवसेना नवी मुंबई मध्ये वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया सौ. शांताताई जाधव यांनी नियुक्ती पत्र स्विकारल्यानंतर व्यक्त केली.
यावेळी शिवसेना उप विभागप्रमुख विजय चांदोरकर, संदीप पवार, शिवसैनिक बाळकृष्ण खोपडे, अजय गायकवाड आदी उपस्थित होते.