कांदा बटाटा बाजारात सुरक्षा रक्षकांकडून वाहन चालकांची लुटमार ?

नवी मुंबई -:वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारात मोठ्या प्रमाणात शेतमालाची  वाहनांद्वारे आवक जावक होत असते. मात्र सदर वाहन चालकांची या बाजार आवारात सुरक्षा रक्षकांकडून वाहन बाहेर पडताना १० ते २० रु घेऊन वाहने बाहेर सोडली जात आहेत.तर रात्रीच्या वेळी गाडी उभी करण्यासाठी १००  ते १५०. रु अवैध रित्या आकारून मोठी लुटमार होत असल्याचा  आरोप कांदा बटाटा बाजार आवारात होत आहे.

वाशीतील कांदा बटाटा मार्केट मध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल घेऊन  रात्रीच्या वेळी वाहने  येत असतात..मात्र बाजार आवारा बाहेर  असलेल्या ट्रक टर्मिनल मध्ये सध्या सिडको मार्फत गृह प्रकल्प उभारण्यास सुरुवात केल्याने  या वाहन चालकांना वाहन  पार्किंग ची समस्या भेडसवते.त्यामुळे सदर वाहन चालक बाजार आवारातच थांबणे पसंत करतात.मात्र.बाजार आवारात या वाहन चालकांडून सुरक्षा रक्षक वाहने उभी करण्यासाठी १०० ते १५० रु घेत असल्याच्या तक्रारी. व्यापाऱ्यांकडे येत आहेत.तर याच वाहनांना बाहेर जाण्यासाठी प्रवेश द्वारावर पुन्हा १० ते २० रु द्यावे लागत.तसेच शेतमाल.खरेदी करून बाहेर जाणाऱ्या स्थानीक वाहन चालकांना देखील या सुरक्षा रक्षकांना पैसे देऊनच. बाहेर जावे लागते.आणि पैसे देण्यास नकार दिला तर अशा वाहनांची नाहक अडवणूक करून त्यांच्या सोबत गैरर्वतन केले जात असल्याचा आरोप देखील होत आहे.आणि सारा प्रकार कैद होऊ नये म्हणुन या ठिकाणी माणी करून देखील सिं सी टिव्ही लावली जात नाही. त्यामुळे कांदा बटाटा बाजार आवारात चालणाऱ्या या लुटमुरीला आळा घालावा अशी मागणी आता वाहन चालक आणि व्यापारी वर्गातून होत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

30 हजाराची लाच स्विकारणारा रायगडचा सह जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात