नवी मुंबईतील जलतरणपटूची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

नवी मुंबई -: नवी मुंबईतील जलतरणपटू झारा जब्बार, १६ हिची फ्रान्समधील नॉर मॅंडी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स फेडररेशन वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. दि.१४ मे ते १९ मे कालावधीत फ्रान्समधील नॉर मॅंडी येथे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स फेडररेशन वर्ल्ड स्कूल गेम्स होणार आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २० प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरील सर्व शाळेतील विद्यार्थी वय १५ ते १८ पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होत असतात. यंदाचे या स्पर्धेचे हे १९ वे वर्ष आहे.

झारा जब्बार ही नवी मुंबईतील वाशी येथे राहणारी असून मुंबईतील ऑटर्स डॉल्फिन अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विजय मिळविला आहे. आता आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी होत आहे. तिने पात्रता चाचण्यांमध्ये भाग घेतला होता, गेल्या महिन्यात पुणे येथील स्कूल गेम्स फेडररेशन ऑफ इंडियाच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये तीची निवड करण्यात आलेली आहे. झाराला लहानपणपासूनच पोहण्याची आवड होती. वयाच्या ५ व्या वर्षापासून तिने पाेहण्यासाठी सुरुवात केली. मात्र कालांतराने तिची ही आवड तिच्या करिअरमध्ये रूपांतरित झाली. अकादमीमधील मोठ्यांचे यश तसेच आशिया स्पर्धक यांचे त्यामध्ये यश पाहून, तिला यामध्ये आणखीन रस वाढत गेला. मागील तीन वर्षांपासून तिने यामध्ये आणखीन मेहनत घेण्यास सुरुवात केली. तिचे प्रशिक्षक संदीप सेजवाल यांच्यासोबत तिचे ध्येय आणखीन बळकट होत गेले. प्रशिक्षक यांच्या बरोबर तिने अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे यामध्ये यश संपादन करून मोठया उंची गाठण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, आता या स्पर्धेत निवड झाली असल्याने ते स्वप्न सत्यात उतरण्याला सुरुवात झाली आहे असे मत यावेळी तिने व्यक्त केले.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

अडवली भुतावली शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड