राष्ट्रीय योगा स्पर्धेत सोनिया व पोलकने मारली बाजी

नवी मुंबई : - योगा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आग्रेसर असलेले आर्ट ऑफ लर्निंग इंस्टिट्युट आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत सोनिया बुरकुले आणि पोलक कुरी यांनी बाजी मारली आहे. सानपाडा येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही स्पर्धा पार पडली. देशाच्या कानाकोप-यातून शेकडो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

निरोगी आरोग्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे, याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये योगाची आवड निर्माण होण्यासाठी आर्ट ऑफ लर्निंग आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चम्पियनच्या वतीने गेल्या ११ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियनचे अध्यक्ष प्रताप मुदलियार, योगगुरू डॉ. रिना अग्रवाल, दिनेश अग्रवाल, कविता मुदलियार, प्राचार्या समृद्धी रॉय, अर्जुन सिंघवी, विधी जैन, तुषार दत्ता, विनय अग्रवाल, एन. आर. परमेश्वरन, रत्ना कोठारी आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभ पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता आणि ऋतू दत्ता यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत देशभरातील शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा एकूण आठ गटांमध्ये पार पडली. त्यामध्ये सहा वर्षांच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या वृद्धांचाही समावेश होता. प्रत्येक गटामध्ये प्रथम येणाऱ्या दोन स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. प्रथम येणाऱ्या आणि विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या २६ स्पर्धकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आर्ट ऑफ लर्निंगच्या डॉ. रिना आग्रवाल यांनी योगामध्ये डॉक्टरेट केली आहे. देशभरातून आलेल्या स्पर्धकांना त्यांनी योगासनांबाबत मार्गदर्शन केले. 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

नवी मुंबईतील जलतरणपटूची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड