उरणमध्ये मोफत 5 वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी फुटबॉल उन्हाळी शिबीर

उरण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ,जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय अलिबाग रायगड व सॅव्हेन स्टार फुटबॉल अॅकॅडमी उरण ( रायगड )यांच्या संयुक्त विद्यमाने  

उरण येथे निशुल्क फुटबॉल खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर दिनांक 12 मे ते 21 में 2022 व 22 मे ते 31 मे 2022  सकाळी ८ ते १० वाजेपर्यत ठेवण्यात आलेले आहे. क्रीडा शिक्षक व फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे सर व विविध फुटबॉल प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दहा दिवसांचे फुटबॉल प्रशिक्षण, हेल्थ अँड फिटनेस, डाइट अँड न्युट्रिशन, स्पोर्ट्स इन्जुरी, प्रथमोपचार, शरीराचा सर्वांगीण विकास या संदर्भात मूलभूत ज्ञान देण्यात येईल.

प्रति दिवस सकाळचे 8 ते 10 असे दोन तासांचे सत्र असतील. 5 वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील मुले व मुली याचा लाभ घेऊ शकतात. प्रथम येणाऱ्या 40 विध्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व मुलांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड मार्फत सर्टिफिकेट दिले जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी - फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक प्रवीण तोगरे सर- 9920626547  संपर्क साधावा .

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

राष्ट्रीय योगा स्पर्धेत सोनिया व पोलकने मारली बाजी