२७ ते २९ मे दरम्यान  मनसेचा 'उरण महोत्सव'

उरण : येत्या २७ ते २९  मे रोजी उरण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.बोकडविरा येथील सिडकोच्या मैदानात  होणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉल्स ची रेलचेल असणार आहे.

       कोरोना काळात घरात अडकून पडलेल्या जनतेला मोकळा श्वास घेण्यासाठी महोत्सव ही पर्वणी ठरते.त्या अनुषंगाने उत्तर रायगड मनसेच्या माध्यमातून २७,२८,२९ मे रोजी उरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आज उरण येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी ही माहिती दिली.

    बोकडाविरा येथील सिडकोच्या मैदानात होणाऱ्या या भव्य महोत्सवात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स,प्रॉपर्टी एक्स्पो,ऑटोमोबाइल्स, लोजेस्टीक जॉब फेर यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.या महोत्सवात मासळी महोत्सव हा विभाग जास्तीतजास्त पर्यटकांना आकर्षित करणारा असणार आहे 

  या महोत्सवात पाककला स्पर्धा,विविध मसाल्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला बचत गटांनी बनविलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहे.

      या महोत्सवासाठी मनसेच्या विविध नेत्यां बरोबरच मराठी सिने सृष्टीतील अनेक कलावंत हजेरी लावणार असल्याने ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.

     या पत्रकार परिषदेसाठी मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे रोजगार स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाने,यांच्यासह ज्येष्ठ नेते सत्यवान भगत,सिद्दी आंगणे,रितेश पाटील,राकेश भोईर,संगीता ढेरे,अल्पेश कडू,,प्रणव कारखानीस आदी उपस्थित होते.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

उरणमध्ये मोफत 5 वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी फुटबॉल उन्हाळी शिबीर