वीर तायक्वॉन्डो अ‍ॅकॅडमीचे घवघवीत यश

पनवेल: पनवेल खांदा कॉलनी येथील न्यु होरायझन पब्लिक स्कुल येथे रविवार पार पडलेल्या रायगड डिस्ट्रिक्ट सब ज्युनिअर आणि कॅडेट तायक्वॉन्डो चॅम्पीयनशीप 2021-22 या स्पर्धेत वीर तायक्वॉन्डो अ‍ॅकेडमीने घवघवीत यश मिळवले.

या स्पर्धेत श्‍लोक गुंजल, स्वयम नाईक, वीर भोईर, मुस्तफा शेख, खंतेश वासकर, सेजल चौधरी, सारा बैयकर यांनी सुवर्णपदक पटकावले. तर रौप्य पदकाचे मानकरी ठरलेते आर्यन इचके, सारा बैयकर तर साची गायकवाड, सोनाक्षी दानावाले यांनी कास्य पदक पटकावले.

वीर तायक्वॉन्डो अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष हरेश्‍वर भगत यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक संजय भोईर, हेमंत कोळी, संदीप भगत, सौ. प्रज्ञा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वीर तायक्वॉन्डो अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नवी मुंबईत रविवारी राष्ट्रीय योगा स्पर्धा