एफ .जी .नाईक  महाविद्यालय, कोपरखैरणे येथे भारतीय संविधान या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन

कोपरखैरणे : कोपरखैरणे येथील एफ.जीनाईक महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे निमित्त साधून भारतीय संविधान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास साप्ताहिक विवेक या वृत्तपत्राचे सहकार्य कारी संपादक तसेच सामाजिक समरसता चळवळीचे कार्यकर्ते रवींद्र गोळे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विस्तृत कार्य समजावून सांगितले त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या नुसार देशामध्ये जातीय वाद तसेच धर्मवाद विसरून सर्व समाज बांधवांनी बंधुभावाची वागणूक करणे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कशी अनिवार्य आहे यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी केले असून त्यांनी आपल्या भाषणात वर्तमान स्थितीमध्ये देशातील लोकांनी आंबेडकरी विचारांचा वारसा आपल्या वैयक्तिक सामाजिक जीवनात कशा रीतीने अंगीकारता येईल यावर भाष्य केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही लक्षणीय होती त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सामाजिक समरसता विभागाचे नवी मुंबई प्रमुख रमेश शिंदे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. जयश्री दहाट यांनी केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

१० वी, ११ वी, १२ वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकार नोकरीची सुवर्णसंधी, मार्गदर्शन शिबीर