मराठी माध्यमाच्या शाळा सेमी इंग्रजीत परिवर्तित करणार - डॉ डोंगरगावकर यांची माहिती 

नवी मुंबई :- हैद्राबाद  मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्रसैनिकांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षण प्रसारक  मंडळ, लातूर येथील मुंबई परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या शाळा, महाविद्यालय संस्थेच्या वतीने भारताचा स्वतंत्र अमृत महोत्सव,  हैद्राबाद  मुक्ती संग्रामचा अमृत महोत्सव , संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन आणि डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सव साजरा करत आहे .त्या पार्श्वभूमीवर २१ व्या शतकातील आव्हाने पेलवणारे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने संस्थेने नवे प्रकल्प आणि उपक्रम  हाती घेतले आहेत. तसेच  जगभरातील बदलते शैक्षणिक धोरण आणि त्या अनुषंगाने  संस्थेने शैक्षणिक  व्यवस्थेत बदल करण्याचे ठरवले असून  मराठी माध्यमाच्या लातूर आणि रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा सेमी इंग्रजी मध्ये परिवर्तित करण्याचे निश्चित  केले असल्याचे प्रा डॉ जी के डॉ डॉ डोंगरगावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले .  

             १३ एप्रिल  ते १३ मे २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाची तपासणी आणि कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम डॉ बाबासाहेब यांच्या जयंती महोत्सवा दरम्यान हाती  घेण्यात आल्याचे डॉ डोंगरगावकर यांनी सांगितले .

        खारघर येथील  सत्याग्रह महाविद्यालयाच्या शांताबाई रामराव सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी पुढे  सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त (१३ एप्रिल ते १३ मे २०२२ दरम्यान )  शाळा व  महाविद्याल  विद्यार्थ्यांना पदवीदान, गुणगौरव, सन्मान करणार , प्रत्येक रविवारी १२ तास अभ्यास , वाचन व  संवर्धन स्पर्धा ,  संस्था स्तरावर वक्तृत्व, निबंध, चित्रकला आणि गीत गायन स्पर्धा घेण्यात येणार आहे .२०२२-२३ वर्षात संस्थेद्वारे   एमएमआरडीए  इलाख्यातील १३१ नवउद्योजक यांना  निशुल्क   प्रशिक्षण याशिवाय  प्रा श्रीपाल सबनीस, डॉ जयदेव डोळे,  डॉ अशोक बहिरट, डॉ पी जी जोगदंड, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे, राजकुमार बडोले यांना पाचारण करून 

शिक्षण आणि सामाजिक न्याय या विषयावर 

  चर्चा सत्राचे आयोजन  करण्यात येणार आहे.यावेळी  महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रायगड या विषयावर प्रा डॉ टी आर घोबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ डोंगरगावकर यांनी सांगितले .

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एफ .जी .नाईक  महाविद्यालय, कोपरखैरणे येथे भारतीय संविधान या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन