ज्ञानविकास हायस्कूल कोपरखैरणे येथे आरोग्य शिबीर

नवी मुंबई ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकल्पग्रस्त महिला आघाडी संघटना व लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मार्च रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन ज्ञानविकास हायस्कूल, कोपरखैरणे येथे करण्यात आले होते. सदर प्रसंगी ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष ॲड पी सी पाटील यांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर शिबिरास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी साई दृष्टी फाऊंडेशन व रिलायन्स हेल्थ टीमचे सर्व डॉक्टर यांनी उपस्थित राहून उच्च रक्तदाब, मधुमेह, डोळे तपासणी सांधेदुखी अशा अनेक रोगांच्या चाचण्या केल्या. कर्करोगावर स्त्री रोग तज्ञ डॉक्टर आलमेडा यांचे उपयुक्त माहितीपर व्याख्यानही यावेळी पार पडले. त्यास महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष, गजानन पाटील, प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री पी.सी.पाटील, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे लायन विजय पाटील, उपाध्यक्ष लायन महेंंद्र सुतार, ज्ञानविकास संस्थेचे प्राचार्य शिक्षक वर्ग, महिला, पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदर उपक्रमाच्या प्रास्ताविक व आभारप्रदर्शनाची बाजू संतोष जाधव यांनी सांभाळली. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मराठी माध्यमाच्या शाळा सेमी इंग्रजीत परिवर्तित करणार - डॉ डोंगरगावकर यांची माहिती