१८ व्या राज्य बालनाट्य स्पधेच्या प्रथम फेरीचे उदघाटन

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून २०, २१ व २२ मार्च दरम्यान १८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा भरवली जात असून तिच्या प्राथमिक फेरीच्या नवी मुंबई केंद्रातील प्रयोगांची  सांगता 22 तारखेस होणार आहे.

 साहित्य मंदिर सभागृह, सेक्टर ६, वाशी येथे २० मार्च रोजी या स्पधेचे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी नवी मुंबईचे रंगकर्मी रवि वाडकर उद्‌घाटक म्हणून तर 'आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत प्रमुख पाहुणे उपस्थित होते. करोना महामारीमुळे दोन वर्षाच्या खंडानंतर या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. गेली दोन वषे आपण सारे करोना साथरोगाने जखडले असल्याने रंगमंचीय कार्यक्रमांना मुकलो होतो. आता सारे खुले होतेय असे सांगत नाट्य आपल्या रक्तात असते, बालपणापासून अभिनय घरातून संस्कारांच्या स्वरुपात मिळत असतो असे रवि वाडकरांनी यावेळी नमूद करुन या स्पधेमुळे मिळालेल्या संधीचा लाभ नवी मुंबईकर बालकलावंतांनी उठवण्याचे आवाहन केले. एक घास काऊचा, एक घास चिऊचा सांगताना आई अभिनयच तर शिकवते. कारण काऊ चिऊ नव्हे, तर आपणच ते सारे बालवयात खाणारे असतो. बालनाट्यांत काम करायला वैभव मांगले, दिलिप प्रभावळकरांसारखे बिनिचे व ज्येष्ठ अभिनेतेही आनंद मानतात असे यावेळी राजेंद्र घरत आपल्या भाषणात म्हणाले. या प्रसंगी विचारमंचावर साहित्य मंदिरचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, स्पधेचे परिक्षक अलका जामकर, शंकरराव घोरपडे, पियुष नाशिककर हेही उपस्थित होते. या स्पधेसाठी यशस्वितेसाठी समन्वयक म्हणून राकेश तळगावकर तसेच सह समन्वयक स्वप्नजा भडभडे, मुकुंद जोशी, स्वामी वर्तक मेहनत घेत आहेत. 22 तारखेस व्हिक्ट्री व्हिजन, ऐरोलीचे लहान माझी बाहुली (ले.दिव्या चौधरी), झपुर्जा कला केंद्र, कल्याणचे खेळण्यांची करामत (ले. गोविंद गोडबोले) आणि वेध क्रिएशन, डाेंबिवलीचे विठ्ठल तो आला आला (ले. पु.ल.देशपांडे) अशी बालनाट्य सादर केली जाणार असून सर्वासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ज्ञानविकास हायस्कूल कोपरखैरणे येथे आरोग्य शिबीर