बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली कडून डी वाय पाटील स्टेडियमची पाहणी

खारघर:  नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये आयपीएलचे काही सामने होणार असल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष  सौरभ गांगुली यांनी मंगळवारी स्टेडियमची पाहणी केली. मात्र सामन्याच्या वेळी केवळ पंचवीस टक्के प्रेक्षक क्षमता ठेवण्यात आल्यामुळे क्रिकेट प्रेमीमध्ये नाराजी पसरली असून प्रेक्षक क्षमता शंभर टक्के करावी अशी मागणी केली जात आहे.

      26 मार्च पासून आयपीएलचे सामने सुरू होत आहे. त्यात काही नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये एप्रिल तसेच मे मध्ये आयपीएलचे सामने होणार असल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष  सौरभ गांगुली यांनी मंगळवारी स्टेडियमची पाहणी करून नवी मुंबई पोलीस समवेत सुरक्षा विषयी माहिती घेतली.दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार स्टेडियममध्ये केवळ पंचवीस टक्के क्षमता ठेवून त्यानुसार क्रिकेट प्रेमीना प्रवेश देण्यात येणार असल्याचे समजले. विशेषतः  दोन वर्षापासून कोरोनामुळे नागरिकांना खुलेपणाने जगण्यापासून वंचित राहावे लागले होते. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शासनाने सर्व निर्बंध हटविले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम मध्ये पंचवीस ऐवजी शंभर टक्के क्रिकेट प्रेमींसाठी खुले करावे अशी मागणी नवी मुंबई, पनवेल परिसरातील क्रिकेट प्रेमी कडून केली जात आहे.

 नवी मुंबई आणि पनवेल महापालिका परिसरात कोरोना रुग्णांची क्षमता शून्यावर आलेली आहे.तसेच शासनाने बहुतांश ठिकाणी सर्व निर्बंध हटविले आहे. तसेच बसेस आणि  लोकल रेल्वेत प्रवासी दाटीवाटीने प्रवास करीत आहे, त्यामुळे शासनाने डी वाय पाटील  स्टेडियम पूर्ण क्षमतेने खुले करावे. - लीना गरड, क्रिकेट प्रेमी व नगरसेविका.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

१८ व्या राज्य बालनाट्य स्पधेच्या प्रथम फेरीचे उदघाटन