25 टक्के आर.टी.ई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

ठाणे :-  जिल्ह्यात  सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता आर.टी.ई 25 टक्के ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पालकांनी बालकांची अर्ज नोंदणी  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex  या वेबसाईट वर दिनांक  28 फेब्रुवारी 2022 पर्यंत करण्याचे आवाहन  प्राथमिक शिक्षणाधिकारी  यांनी केले आहे.

            बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण 648 शाळा पात्र असून  इयत्ता 1 ली साठी  11469 व  पूर्व प्राथमिक साठी 798 जागा उपलब्ध आहेत.

            पालकांना ही प्रवेश प्रक्रीया सुलभ होण्याच्या दृष्टीने ऑन लाईनप्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual) , आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 हे घटक प्रवेश घेऊ शकतात

            या प्रवेश प्रक्रियेत SC/ST/NT/OBC/SBC हे वंचित घटक प्रवेश घेऊ शकतात. तसेच 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या बालकांना  आणि 40 टक्के दिव्यांग असणाऱ्या बालकांना आर.टी. ई च्या माध्यमातून प्रवेश घेता येतो.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ