महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षणशुल्क प्रतिपूर्ती ( फ्रिशिप ) या योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरीता २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी सदर मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण मुंबई विभागाच्या उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे अर्ज करु न शकलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने सदर मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचे नविन अर्ज तसेच जुन्या अर्जांचे नुतनीकरण करता येणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांनी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाडिबीटी या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरावेत. सदर योजनेसाठी शासनाने ५ वेळा मुदतवाढ दिली आहे. सदर मुदतवाढ ही अंतिम असून मुंबई विभागातील विद्यार्थी, पालक तसेच संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी तात्काळ नवीन तसेच नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.