महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अमित ठाकरेंच्या हस्ते नवी मुंबईत ३ मनसे शाखांचे उद्घाटन
नवी मुंबई : मनसेच्या "शिवजनसंपर्क अभियानाचे" औचित्य साधून मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या नेरूळ, जुईनगर व घणसोली विभागातील तीन शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी सामाजिक उपक्रम व संकल्प स्वीकारून मनसेने अनोखे उपक्रम राबविले असल्याचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. याप्रसंगी वृक्षरोपण व त्या वृक्षांना दत्तक घेणे, वाचनालयाला पुस्तके भेट देणे व महिला सफाई कामगारांना रेशन कीट देणे असे निरनिराळे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक व जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी मनसे नेते अमित ठाकरेंसोबत छायाचित्र व सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
नेरूळ येथील मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी २५ झाडांचे वृक्षरोपण करून या सर्व वृक्षांना मनसेच्या शाखेने दत्तक घेतले आहे. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वतः वृक्षरोपण केले व या अभिनव उपक्रमाचे कौतुक वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आशिया खंडातील सर्वात छोटी गिर्यारोहक श्रविका म्हात्रे हिला देखील सन्मानित करण्यात आले. जुईनगर येथील मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबईतील कुसुमाग्रज वाचनालयाला पुस्तकांचा संच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. घणसोली येथील मनसेच्या रस्ते आस्थापना व साधन सुविधा विभागाचे शहर संघटक संदीप गलुगडे यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी विभागातील महिला सफाई कामगार यांना एक महिन्याचे रेशन कीट मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवापासून नवी मुंबई शहरात १९ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मनसे आयोजित "शिवजनसंपर्क अभियानाला" सुरुवात झाली आहे. या शिवजनसंपर्क अभियाना अंतर्गत नवी मुंबईकरांशी थेट भेटून संवाद साधणार असल्याचे व या संवादातून नवी मुंबईकरांच्या शहर विकासाबाबत विचार, सूचना व दृष्टिकोन जाणून घेणार असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.
या भेटींमध्ये नवी मुंबई शहरातील महिला भगिनी, विविध बचत गट, तरुण युवक मंडळे, पर्यावरणप्रेमी, डॉक्टर, अधीवक्ते, वास्तूविशारद, अभियंते, तसेच कला क्षेत्रातील मंडळी, कामगार वर्ग, तसेच बुद्धिजीवी लोकांचा समावेश असल्याचे व त्यांचे शहर विकासाबाबत संकल्पना, विचार व दृष्टिकोन जाणून घेणार असल्याचे गजानन काळे म्हणाले. नवी मुंबईकरांनी मनसेच्या या "शिवजनसंपर्क अभियानात" मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले आहे.
याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, प्रसाद घोरपडे, सचिव सचिन कदम, विलास घोणे, सचिन आचरे, सह-सचिव अमोल इंगोले, अभिजित देसाई, दिनेश पाटील, शरद डीघे, नितीन लष्कर, व मनसेच्या संलग्नित सेलचे सागर नाईकरे, किरण सावंत, अप्पासाहेब कोठुळे, सनप्रीत तुर्मेकर, एड.निलेश बागडे व मोठ्या संख्येने स्थानिक मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
- सचिन कदम, शहर सचिव