एफ. जी. नाईक महाविद्यालय मध्ये पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण 

नवी मुंबई ः श्रमिक शिक्षण मंडळ संचालित कोपरखैरणे मधील एफ. जी. नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमानाने १४ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता महाविद्यालय प्रांगणात १४ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

सदर आदरांजलीच्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालय मधील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी अमर जवान स्मारकाची प्रतिकृती तयार करुन सर्क्रिंनी त्या स्मारकास आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करुन  शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून विद्याथ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. याशिवाय मुलांमधे सैन्य भरती बद्दल जनजागृती केली. या कार्यक्रमत ‘एफ.जी. नाईक महाविद्यालय’चे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी शहिदांना श्रध्दांजली वाहून मनोगत व्यक्त केले. 

सर्व विद्याथ्र्यांनी भेदभाव त्यागून एकीने राष्ट्राचे हित जोपासण्यासाठी आणि भारत देशाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी राष्ट्रीय एकात्मतेवर कायम दक्ष राहून कार्य करावे, असे आवाहन यावेळी  प्राचार्य प्रताप महाडिक यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंससेवकांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ.जी.नाईक महाविद्यालय मधील विद्यार्थिनी कु.अनुष्का निकाम, कु. तनुजा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका जयश्री दहाट आणि प्राध्यापक संदेश सूर्यवंशी यांनी केले. शहिद श्रध्दांजली कार्यक्रमाला एफ. जी. नाईक महाविद्यालय मधील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

25 टक्के आर.टी.ई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात