राजकीय दाबावाखाली प्रारूप प्रभाग रचना ?

नवी मुंबई-: नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने पाडण्यात आलेली भौगोलिक प्रारूप प्रभाग रचना ही अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन केली आहे असा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला होता.आणि याच आरोपाची री ओढत  ठाणे आणि नवी मुंबईतील प्रभागांचे अधिकाऱ्यांनी दबावाखाली येत तुकडे केले आहेत. असा आरोप महाविकास आघाडी सरकार मधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी केला आहे..

नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाज बहुसदस्यीय पद्धतीने लढवली जाणार असून एका प्रभागात ३ सदस्य असतील. तर ठाणे शहरात आधीपासूनच बहुसदस्यीय पध्दतीने निवडणूक होत आली आहे. आणि या दोन्ही निवणूकींकरीता १ फेब्रुवारी रोजी भौगोलिक सीमा दर्शवणारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. आणि या मध्ये बऱ्याच मातब्बर नगरसेवकांच्या प्रभागांचे तुकडे करण्यात आल्याचे दिसून आले. सदर प्रभाग रचनेचे काम सुरू असतानाच अधिकारी दबावाखाली येऊन ही प्रभाग रचना पार पाडत असल्याचा आरोप भाजप तर्फे आमदार गणेश नाईक यांनी केला होता. तर माजी आमदार संदीप नाईक यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती.

त्यानंतर १ फेब्रुवारीला पुन्हा आमदार गणेश नाईक यांनी प्रभाग रचनेबाबत आरोप करत ही रचना अधिकाऱ्यांनी दबावाखाली येत नियम बाह्य पद्धतीने राबवली गेली असल्याचा पुनरुच्चार करत न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले होते.

तर आता या प्रभाग रचनेवरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आरोप केले असून अधिकारी वर्गाने दबावाखाली येत ठाणे आणि नवी मुंबईची प्रभाग रचना केली आहे.आणि हे महापालिका अधिनियमाला धरून नाही. त्यामुळे आयुक्तांनी दबावाखाली येऊन काम करणे हे चुकीचे आहे असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवरून खुद्द सरकार मधील मंत्र्याने आरोप केल्याने आमदार गणेश नाईक यांच्या आरोपाला दुजोरा मिळत आहे. त्यामुळे आता नागरीकांच्या हरकतींवर राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतात याकडे सर्व इच्छुक उमेदवारांच्या नजरा असतील.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस विभागातर्फे कळंबोली येथे रोजगार मेळावा