श्री कुलस्वामी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी करा - मनसे

नवी मुंबई-; श्री कुलस्वामी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी  ठाणे शहर उपनिबंधक विशाल जाधव यांच्याकडे केली आहे.

  कुलस्वामिनी पतसंस्था ही साधारण ३८ वर्षे सेवा देत असून संपूर्ण महाराष्ट्रात एकुण ३७ शाखा आहेत. या संस्थेत साधारण १५०००० इतके सभासद आहेत. करोडो रुपये वार्षिक उलाढाल असणाऱ्या या संस्थेत शाखा नूतनीकरण, नवीन शाखा सुरू करणे व यासाठी नवीन जागा खरेदी करणे तसेच आर्थिक कामकाजात भ्रष्टाचार उघड झाल्याचे निदर्शनास आल्याने. सहकार अपर निबंधक डॉ.पी. खंडागळे  पुणे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सभासदांचे व ठेवीदारांचे हित, पैसा लक्षात घेवूनच  शासन-प्रशासन नियम व अधिनियमानुसार पारदर्शकता ठेवूनच सदर घोटाळ्याची चौकशी करावी. जेणे करून पतसंस्था भागधारक व सभासद यांचा संस्थेवर असणारा विश्वास कायम राहील. तसेच सदर प्रकरणी  लेखापरिक्षक यांना ही दोषी ठरवण्यात यावे व चौकशीत दोषी असणाऱ्या संचालक मंडळावर ही कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.

        यावेळी उपनिबंधक ठाणे शहर  विशाल जाधव यांनी या प्रकरणी  पारदर्शकपणे चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करण्याचे व पतपेढीच्या सभासदाना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. विनायक जाधव, आशिष मोरे, संकेत निवडुंगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून नेरूळमध्ये निषेध