सिडको युनियनवर पुन्हा एकदा प्रगती पॅनेलचे वर्चस्व

नवी मुंबई ः सिडकोच्या ५० वर्षार्च्या कार्यकाळात प्रथमच कर्मचारी युनियनच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध करून सिडको कर्मचाऱ्यांनी आपल्यातील एकजुटीचे दर्शन घडवले आहे. युनियनच्या अध्यक्ष पदासाठी प्रगती प्ॉनलचे विनोद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकाऱ्यांनी केली आहे.

मुदत संपलेल्या सिडको एम्प्लॉईज युनियनच्या नवीन कार्यकारणीच्या निवडीकरिता येत्या १० फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक संपन्न होण्यापूर्वीच एकता पॅनेलच्या उमेदवारांनी दाखल केलेले अवघ चार उमेदवारी अर्ज मागे घतल्यामुळे प्रगती पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे गत १५ वर्षांपासून सिडको एम्प्लॉईज युनियनवर फडकत असलेला प्रगती पॅनेलचा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला आहे.

सिडको एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल हे सेवानिकत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या युनियनच्या अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी युनियनचे उपाध्यक्ष विनोद पाटील सांभाळीत होते. करोना संसर्गार्मुळे तब्बल दोन वर्ष नवीन कार्यकारिणीची निवड होऊ शकली नव्हती. करोना आपत्तीची तिसरी लाट ओसरत असल्याने युनियनने रितसर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
परंतु, गत १५ वर्षांपासून युनियनवर पकड असलेल्या प्रगती पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी   कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांना वेळोवेळी सुविधा मिळवून दिल्याने विद्यमान कार्यकारिणीने कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच विद्यमान युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात म्हणजेच प्रगती पॅनेल विरोधात तुल्यबळ असे उमेदवार एकता प्ॉनल देऊ शकली नाही. २५ सदस्यांच्या कार्यकारिणीकरिता एकता पॅनेलने अवघ चार सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

परंतु, प्रगती पॅनेलला कर्मचाऱ्यांचा असलेला पाठिंबा लक्षात घऊन एकता पॅनेलच्या चार उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घतले. त्यामुळे निवडणूकीचे कामकाज पाहणारे निवडणूक निरीक्षक नितीन घरत यांनी युनियनच्या अध्यक्ष पदी प्रगती प्ॉनलचे विनोद पाटील यांची तर सरचिटणीसपदी जे.टी.पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. प्रगती पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आल्याने सिडकोत शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. युनियनच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र हिरे, संजय पाटील, तर चिटणीसपदी नितीन कांबळे व खजिनदार पदी दत्ता तांडेल हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सिडको एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्या  हिताचे अनेक महत्वाचे निर्णय व्यवस्थापनाकडून मंजूर करुन घण्यात युनियनला यश मिळाले आहे. सिडको कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगत माजी अध्यक्षांचे कार्य आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने पुर्ण करणार असल्याचे सांगत सिडको प्रशासनातील अनेक वषे रखडलेली नोकरभरती करणे, र्व्हच्युअल बेसेसवर १४३ कर्मचाऱ्यांना सिडकोच्या सेवेत कायम करणे, कर्मचाऱ्यांना हौसिंग सोसायटी भूखंडाचे वाटप करणे आदी प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलणार असल्याचे युनियनचे नवनिर्वार्चित अध्यक्ष विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी  विनोद म्हात्रे