युवा सेनेच्या दणक्याने हॉस्पिटल नरमले; नवजात बाळ आणि पालकांची केली सुटका 

खारघर: युवासेनेच्या दणक्याने खारघरमधील हॉस्पिटलमधूननवजात बालकाला डिस्चार्ज मिळवून देण्यात आला आहे. तसेच त्याच्या उपचारासाठी आलेल्या बिलातील 9 लाखसुद्धा हॉस्पिटल प्रशासनाकडून माफ करण्यात आल्याने पालक समाधान व्यक्त करीत आहे.    

      कर्जत येथील वसीम जालानी  यांच्या कुटुंबात  पाच महिन्यांत जन्मलेल्या  अकाली बाळाचे उपचार खारघरमधील मदरहूड हॉस्पिटलमध्ये गेले चार महिने चालू होते. अकाली (प्रिमॅच्युअर बेबी) बाळ जन्मल्यामुळे इलाज खूप गुंतागुंतीचा होता. रूग्णालयात दाखल करत असताना हॉस्पिटलकडून साधारणपणे पंधरा लाख खर्च येईल असे सांगितले. कालांतराने उपचार चालू असताना बाळाचे उपचाराचे बिल  जवळपास 27 लाख रुपये झाल्याचे  रुग्णालयाकडून  सांगण्यात आले. त्यापैकी रोखरक्कम व इतर काही रक्कम कर्ज वसीम याने 17 लाख रूपये  भरले होते. उर्वरित रक्कम भरल्या शिवाय  डिस्चार्ज मिळणार नाही असे सांगून बाळाची अडवणुक करीत होते. वासिम जालानी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तक्रार केली व मदत मागितली असता. दरम्यान बारणे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता दिल्लीला असल्याने सदर प्रकरण हाताळण्याची सूचना खारघर येथील युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांना दिले. राऊत यांनी शिवसेना विभागसंघटक रामचंद्र देवरे, विभागप्रमुख उत्तम मोर्बेकर, युवासेना उपतालुका अधिकारी अनिकेत पाटील, युवासैनिक संकेत पाटील, विजय रोकडे, प्रकाश राजपुत, यांना सोबत घेऊन मदर हूड हॉस्पिटलला भेट देत तेथील प्रशासन व उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून खरी परिस्थिती त्यांच्या समोर मांडली व उर्वरित बिल माफ करण्याची विनंती केली. त्यानुसार यशस्वी मध्यस्थी करत उर्वरित असलेल्या बिलापैकी 9 लाख रूपयांचे बिल हॉस्पिटल प्रशासनाकडून कमी करून घेऊन डिस्चार्ज मिळवून दिल्याने वसीम जालानी यांनी सर्वांचे आभार मानले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ऑलिम्पिक स्तरावरील रायफल शुटींग खेळाचे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण