ऑलिम्पिक स्तरावरील रायफल शुटींग खेळाचे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत असते. यामध्ये विशेषत्वाने महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंना प्रशिक्षण सुविधा सुध्दा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिका संचालित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहेत.

      आजच्या स्पर्धात्मक युगात जागतिक स्तरावर ऑलिम्पिक मधील खेळांना विशेष महत्व आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक रायफल शुटींग (नेमबाजी) या स्पर्धेत भारताने मिळविलेले आहे. त्यामुळे रायफल शुटींग क्रीडा प्रकाराकडे युवकांचा ओढा आहे. त्यामुळे या क्रीडा प्रकारात आवड असलेल्या महानगरपालिका शाळांमधील मुलांना महापालिकेच्या वतीने रायफल शुटींगचे विशेष प्रशिक्षण देण्याची वैशिष्टयपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.

      यामध्ये महापालिका शाळांमधील इच्छुक मुलामुलींची या क्षेत्रातील अनुभवी संस्थेच्या माध्यमातून नैपुण्य चाचणी घेण्यात येईल. या चाचणीतून 10 मुले व 10 मुलींची अंतिम प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. अंतिम निवड होणा-या मुलामुलींना अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येईल.

      अशाप्रकारे जागतिक स्तरावर ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणा-या रायफल शुटींग खेळामध्ये महानगरपालिका शांळामधील मुलामुलींना सुध्दा आपली गुणवत्ता सिध्द करता यावी यादृष्टीने सध्या महापिालिका क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या सुविधांच्या ठिकाणी तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी या संधीचा रायफल शुटींगमध्ये आवड असणा-या मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व पालकांनीही त्यांना यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

चित्रकलेच्या माध्यमातून निर्जीव भिंती बोलू लागल्या