कुडाळच्या "बिलिमारो"ने जिंकले राज्यस्तरीय अटल करंडक

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धा कोण जिंकणार याची महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता अखेर रविवारी संपली. तीन दिवस चाललेल्या महाअंतिम फेरीत 'ढ' मंडळी कुडाळ या संस्थेच्या "बिलिमारो" या एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत एक लाख रुपये आणि मानाचा करंडक असे स्वरूप असलेला प्रथम क्रमांक पटकावून मानाच्या आठव्या अटल करंडकावर आपले नाव कोरले.   सर्वोत्कॄष्ठ  अभिनेताचा किताब  "बिलिमारो" एकांकिकांमधील रंगा, सर्वोत्कॄष्ठ अभिनेत्रीचा किताब हायब्रिड एकांकिकांमधील ज्ञानेश्वरी मंडलिक हिने पटकाविले. तसेच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर यांना जीवन गौरव स्वरूपात 'गौरव रंगभूमीचा' हा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.  ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप पुरस्काराचे होते. 
 
           शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, महापौर डॉ. कविता चौतमोल, स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर ओमकार भोजने, अभिनेते मंगेश कदम, परीक्षक सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय केंकरे, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध लेखक व अभिनेता संजय मोने, सुप्रसिद्ध लेखक डॉ.नितीन आरेकर, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, हास्य जत्रा फेम शिवाली परब, वनिता खरात, निखिल बने, स्पर्धा सचिव श्यामनाथ पुंडे, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी देशमुख,  सुप्रसिद्ध सिने नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, श्री व सौ नील कोठारी, प्राथमिक फेरीचे परीक्षक अभिजीत झुंजारराव, प्रमोद शेलार, अमोल खेर, स्मिता गांधी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयूरेश नेतकर,  पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कोकण विभाग सांस्कृतीक प्रकोष्ठच्या सहसंयोजिका अक्षया चितळे  उपस्थित होते  
 
   यावेळी पारितोषिक वितरण समारंभाचे  प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, अटल करंडक स्पर्धेचे हे पारितोषिक महत्वाचे आहे कारण या स्पर्धेतून पुढे आलेल्या कलाकारांनी महत्वाचे योगदान मराठी रंगभूमीला दिलेले पाहायला मिळते. नाटकाच्या एकांकिकेत जो उभा राहतो तो नेहमीच चांगला कलाकार असतो म्हणून मी आजच्या निमित्ताने तुम्हाला आवाहन करतो की महाराणा प्रतापच्या ऑडीशनसाठी तुम्ही या मी सगळ्यांचे स्वागत करतो, असे नितिन चंद्रकांत देसाई यांनी कलाकारांना आवाहन केले. यावेळी त्यांनी स्पर्धेत झालेल्या १०८ एकांकिका पाहण्याची इच्छा ही व्यक्त  केली त्यांनी पुढे बोलताना म्हंटले कि,  आज मला आनंद होत आहे. कारण ३३ वर्षापूर्वी मी पण तुमच्या जागी होतो. याच तुमच्या पद्धतीने २५ जागांमध्ये निवड होऊन आपल्या पारितोषिक मिळणार का ? याची वाट पाहत होतो. माझ्या आयुष्याचा पहिला सेट मी नाटकाचा लावलेला. तो पण एकांकिका स्पर्धेचा. मी आता ३३ वर्षा नंतर एक महत्वाकांक्षी प्रयोग करतोय. महाराणा प्रताप यांचेवरती मोठी सिरिज करतोय मला असे वाटतेय की एवढे स्पर्धक इथे आलेत त्यांच्यासाठी आपण एन.डी. स्टुडिओत ऑडीशन ठेऊया. स्टेजवर बोलून तुमच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मला असे वाटते की  प्रत्यक्षात काही तरी घडवायला पाहिजे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एवढे कार्य केले आहे. प्रशांतजी आणि परेशजी  एवढं काही करतायत तर माझ्या माध्यमातून ही काही करावे असे वाटते.  आपल्या महाराष्ट्रात या रायगड मध्ये भरपूर कलाकार आर्टिस्ट आहेत. फक्त कमी पडतो आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची जिद्द. चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळके या मराठी माणसाने उभारली. त्यानंतर करोडोचे  त्यामध्ये भांडवल टाकून ही इंडस्ट्री फोफावली. पण आपण थोडेसे कोठे तरी त्यामध्ये मागे असू म्हणून माझा एक खारीचा वाटा आहे.  आपण त्यामध्ये कोठे तरी पुढे जावे यासाठी मी माझ्या कार्यक्रमात किवा प्रोजेक्ट मध्ये आपल्या लोकांना स्थान देत असतो आजच्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की महाराणा प्रतापसाठी मी तुमचे सगळ्यांचे ऑडीशनसाथी स्वागत करीत आहे.   
Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

सचिन ठाकूर महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2022 ने सन्मानित