महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
जुहू चौपाटीचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही - शीतलताई भोईर
नवी मुंबई :वाशी सेक्टर १० ए येथील खाडी किनारी अललेल्या परिसराला अधिकृत असे जुहू चौपाटी नाव असून देखील मागील काही दिवसांपासून मनपाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामात जाणीवपूर्वक मिनी शिशोर असा उल्लेख केला जात आहे.तसेच या ठिकाणी मिनीशिशोर असे सेल्फी पॉईंट बनवण्यात आले आहे.हा सरळ सरळ जुहूचौपाटी नावाचे अस्तित्व मिटवण्याचे हेतुपुरस्सर कटकारस्थान आहे.त्यामुळे मनपा प्रशासनाने या ठिकाणी जुहू चौपाटी असे सेल्फी पॉईंट नाही बवलले तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपच्या जुहूगाव, बेलापूर मंडळ अध्यक्ष शीतल ताई भोईर यांनी दिला आहे.
सिडकोने नवी मुंबईतील गावागावांतील भूमिपुत्रांची जमीन संपादित करुन नवी मुंबई शहराची निर्मीती केली .आणि याच काही मोठ्या गावांच्या नावाने शरतील उपनगरांना नावे पडली आहेत. मात्र काही राजकिय नेत्यांनी ही नावे पुसण्याचा आता घाटच घातला असून त्यास प्रशासनाची देखील फूस आहे.वाशी सेक्टर १० ए परिसरातील खाडी किनारी भागाला जुहूचौपाटी असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. त्याबाबत १०फेब्रुवारी २०१५ रोजीच्या महापालीका सर्वसाधारण सभेत महापौर यांचेमार्फत सूचित नामकरण प्रस्तावामध्ये “वाशी, से.१०ए, येथील चौपाटीचे “जुहू चौपाटी” असे ठराव क्र. ९८४ नुसार नामकरण झालेले आहे.असे असले तरी काही राजकारणी जुहू चौपाटी नावाच्या ऐवजी मिनी शिशोर नाव लावण्यासाठी आजही आग्रही आहेत.त्यासाठी जुहूचौपाटी खाडीत ' लव वाशी मिनी शिशोर'अशा नावाने सेल्फी पॉईंट बनवला आहे.आणि त्या मिनिशीशोर नावाला जुहूगावातील ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे.तर महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामाबाबत कागदोपत्री देखील वाशी मिनी शिशोर तसेच नवी मुंबई महापालिका अर्थसंकल्पात मनपा आयुक्त यांनी केलेल्या निवेदनात देखील वाशी मिनी शिशोर असा उल्लेख केला आहे.त्यामुळे जुहू चौपाटी चे अधिकृत असलेले नाव जाणीव पूर्वक वाशी मिनी शिशोर असा केला जात.त्याबाबत जुहु गावातील ग्रामस्थानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.याची दखल आता भाजपाच्या जुहू ,बोनकोडे मंडळाच्या अध्यक्षा शीतल भोईर यांनी मनपा वाशी विभाग अधिकारी महेश हंशेट्टी यांना निवेदन दिले आहे.आणी यापुढे येथील कामकाजाबात प्रशासन स्तरावर जुहू चौपाटी असाच उल्लेख करावा तसेच येथी मिनी शिशोर सेल्फी पॉईंट हटवून जुहुगाव सेल्फी पॉईंट या नावाने सेल्फी पॉईंट बनवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.