महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
सातत्यपूर्ण कारवाईमुळे वाशी विभाग फेरीवाला मुक्त ?
नवी मुंबई-:नवी मुंबई महानगर पालिकेच्या वाशी विभागात सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांनी पदभार सांभाळताच आपल्या कामाचा धडाका लावला आहे. यात अनधिकृत फेरीवाल्यांवर रोज कारवाई होत असल्याने फेरीवाल्यांनी गजबजलेला वाशी विभाग आज मोकळा श्वास घेत आहे.
वाशीतील सेक्टर ९ ,१० आणि १५,१६ हे अनधिकृत फेरीवाल्यांचे माहेर घर बनले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोज शेकडो फेरीवाले ठाण मांडून बसतात. यात शहरा बाहेरील मानखुर्द गोवंडी, चेंबूर भागातील फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे.त्यामुळे सदर फेरीवाल्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांना या भागातुन सायंकाळी वाट काढणे कठीण होऊन बसते. याबाबत याआधी वारंवार तक्रारी होऊन देखील फक्त दिखाव्याची कारवाई होत असे. मात्र सुखदेव येडवे यांनी वाशी विभागाचा विभाग अधिकारी म्हणून पदभार सांभाळताच आपल्या कामाची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईत सातत्य ठेवत रोज कारवाई करत आहेत. त्यामुळे नेहमी फेरीवाल्यांनी गजबजलेला वाशीतील हा भाग आज मोकळा श्वास घेत आहे. त्यामुळे विभाग अधिकारी सुखदेव येडवे करीत असलेल्या कारवाई मुळे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची आठवण वाशीकरांना झाली असावी असे म्हटले तर वावगे ठरू नये.