महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कांदा बटाटा विक्रेत्यांमुळे माथाडी भवन चौकात वाहतूक कोंडी
नवी मुंबई-: एपीएमसी बाजार आवारातील माथाडी भवन चौकात मागील काही महिन्यांपासून वाहने उभी करुन कांदा बटाटा विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. मात्र सदर उभ्या वाहनांमुळे आणि खरेदीसाठी ऊभ्या केलेल्या वाहनांमुळे या चौकात वाहतूक कोंडी होत असून सर्वसामान्य वाहन चालकांना याचा नाहक त्रास होत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून एपीएमसी बाजार समितीची ओळख आहे.त्यामुळे या ठिकाणी खरेदीसाठी रोज हजारो ग्राहक येत असतात.आणि याचाच फायदा घेत एपीएमसी परिसरात अनधिकृत व्यवसायिकांचे जाळे पसरले आहे.याठिकाणी बाजार पेठ बाहेर मोठया प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असताना आता थेट वाहने उभी करून व्यवसाय केले जात आहेत. एपीएमसी माथाडी भवन चौकात देखील हीच अवस्था आहे.याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी करून कांदा बटाट्याची विक्री केली जाते. त्यामुळे एकाच वेळी विक्री साठी आणि खरेदीसाठी ऊभ्या केलेल्या वाहनांमुळे या चौकात वाहतूक कोंडी होते. मात्र सदर व्यवसायिकांमुळे वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे हाथ ओले केले जात असल्याने या वाहनांवर कारवाई न करता त्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते.त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालकांना याचा नाहक त्रास होत आहे.
माथाडी भवन चौकात वाहनातून कांदा बटाटा विक्री करणारे व्यवसायीक एपीएमसी घाऊक बाजारातुन माल खरेदी करुन किरको विक्री करीत असतात.तरी देखील अनधिकृत शेतमाल विक्री विरोधात कारवाई साठी आता समीती गठीत होणार असून पुढील आठवड्यात एपीएमसी बाजार आवाराबाहेरील सर्व व्यवसायांची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल.
अशोक वाळुंज, संचालक ,कांदा बटाटा मार्केट,