प्रदुषण मंडळाकडुन कारवाईत दुजाभाव ?

नवी मुंबई-:महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या वतीने तळोजा एमआयडीसित वायू आणि जल प्रदूषण करणाऱ्या १० कारखान्यांवर कारवाईचा बडगा नुकताच उगारला होता.मात्र नवी मुंबई शहरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी म्हणून सर्वच स्तरावर मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने प्रदूषण मंडळ कारवाईत दुजाभाव करीत आहे ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तळोजा एमआयडीसीत कारखान्यांमधून सोडण्यात आलेली रसायने आणि वायू सोडण्यात येत होते. आणि या प्रदूषणामुळे खारघर आणि तळोजा भागातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या जाणवत होत्या.  त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या दरम्यान औद्योगिक वसाहतीत पाहणी दौरा केला. या दौऱ्या दरम्यान तीन कारखाने बंद करण्यात आलेत तर एका कारखान्याला प्रस्तावित आणि सहा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.मात्र नवी मुंबई शहरातील रबाले ,महापे व पावणे औधोगिक क्षेत्रामधील  रसायनीक कारखान्यातून सातत्याने रासायनीक द्रव्य मिश्रित पाणी सोडले जात आहे.तसेच रात्री प्रदूषित वायू सोडले जात असते.त्यामुळे नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन नागरीकांना श्वास घेण्यास अडचणी येत असतात. एकीकडे कोरोना महामारी सुरु असल्याने हा आजार थेट रुग्णांच्या फुफ्फुसावर मारा करत आहे.तर आता ओमायक्रोन या नवीन कोरोनाच्या प्रकाराने कहर केला आहे. अशापरिस्तिथीत एमआयडीसीतील कारखानादारांकडुन  होणाऱ्या  मोठया प्रमाणात  प्रदूषित वायू सोडल्याने नागरिकांचे आरोग्य आणखी घोक्यात आले आहे.आणी याबाबत नवी मुंबई शहरारील सर्वच स्तरातून कारवाईची मागणी होत आहे. मात्र याकडे प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 विधान भवनात आवाज उठवून देखील कारवाई नाही.

नवी मुंबई शहरात होणाऱ्या सततच्या वायू आणि जल प्रदूषणामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अशा कारखान्यांवर कारवाई करावी म्हणून आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी केली करत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तसेच याबाबत राज्याच्या अधिवेशनात देखील आवाज उठवला आहे. मात्र या साऱ्या मागण्यांकडे प्रदूषण मंडळाने दुर्लक्ष केल्याने नवी मुंबईत छुप्या पध्दतीने वायू प्रदूषणाचे सत्र सुरूच आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सातत्यपूर्ण कारवाईमुळे वाशी विभाग फेरीवाला मुक्त ?