महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अवैध कृषी व्यवसायाला बसणार चाप
नवी मुंबई-:नवी मुंबईत खाजगी कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर बुडवून बाहेरील व्यापारी परस्पर व्यवसाय करत आहेत. त्यामुळे बाजार समितीलां नुकसान होत आहे म्हणून आता या अवैध कृषी व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी एक समिती गठीत करण्याच्या सुचना राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील व पणन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
शेतमालावरील नियमन मुक्ती उठविल्याने नवी मुंबई सह मुंबई उपनगरात अनधिकृतपणे कृषीमालाची थेट बाजारपेठ, थेट व्यापार वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारसमितीवर त्याचा परिणाम होत असून शेतमालाची आवक उतरणीला आली आहे. परिणामी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही घटली आहे. नियमनमुक्तीचा फायदा घेवून हे परदेशी व परप्रांतातील व्यापारी नवी मुंबई येथे यवून अनाधिकृतरीत्या व्यापार करत आहेत. या सर्व व्यापाराची कुठेच नोंद होत नसून त्याचा ना शासनाला फायदा होत आहे, ना भारतीय शेतकऱ्यांना फायदा होत आहे. तसेच मुंबई बाजार समितीच्या एमएमआरडीए क्षेत्रामधील अनाधिकृत खाजगी चालू असलेले फळे भाजीपाला मार्केट (बोरीवली, गोरेगाव, दहीसर, नागपाडा, दादर, घाटकोपर) अशा विविध ठिकाणी अनाधिकृत खाजगी बाजार चालू आहेत. त्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई ज्या कारणासाठी स्थापन करून मुंबईतील कृषि व्यापार नवी मुंबईत स्थलांतरीत करण्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मुंबई शहरातील अनाधिकृत खाजगी बाजार तत्काळ कारवाई करून बंद करण्यात यावेत अशी मागणी बैठकीत व्यापारी प्रतिनिधी संचालक यांनी केली होती. याप्रसंगी बाळासाहेब बेंडे यांनी सभेस निदर्शनास आणून दिले की, शासनाने ज्यावेळी बृहन्मुंबईतून टप्प्याटण्याने नवी मुंबई बाजार आवार स्थलांतरीत करतांना व्यापाऱ्यां समवेत केलेल्या समझोता करारनाम्यामध्ये व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय अन्य ठिकाणी उपबाजार आवार निर्माण केले जाणार नाही, असे मान्य केलेले आहे. त्यामुळे अन्य ठिकाणी उपबाजार निर्माण करण्यात येऊ नये अथवा बाजार आवाराबाहेर अनधिकृतरित्या सुरु असलेला बाजार आवार तात्काळ बंद करावा असे मत व्यक्त केले.यावेळी अपर मुख्य सचिव (गृह), अनुप कुमार, प्रधान सचिव, (पणन) बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त , नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त , पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त, नवी मुंबई तसेच मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, आमदार शशिकांतजी शिंदे, सदस्य संजय पानसरे, शंकर पिंगळे, अशोक वाळूंज, बाळासाहेब बेंडे, इत्यादी तसेच गृहविभाग, पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.