गुणात्मक व संख्यात्मक मतदानातील वाढ हाच समृद्ध लोकशाहीचा आधार असेल - डॉ. भगवान लोखंडे.

उरण :  उरण तालुक्यातील फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर महाविद्यालय व बी.जी. तटकरे महाविद्यालय, थळा. जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्यशास्त्र विभागाच्या पुढाकाराने बाराव्या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. लोखंडे बोलत होते. त्यांनी बुद्धकालीन, मध्ययुगीन, ब्रिटिशकालीन व भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या निवडणूक व मतदान प्रक्रिया तसेच लोकशाही व  स्वतंत्र निवडणुकांत पुढील आव्हाने या विषयांवर सखोल माहिती श्रोत्यांपुढे ठेवली. कोणत्याही स्तरावरील निवडणुकांमधील प्रत्येक मतदाराने नोंदवलेले एक मत आपल्याला सदृढ लोकशाहीच्या दिशेने घेऊन जाणार आहे. याकरिता प्रत्येक नागरिक आणि विशेषतः तरुणांनी निवडणुकीच्या या लोकशाही उत्सवात आनंदाने सहभागी व्हावे व इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिवर्षाप्रमाणे वीर वाजेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप घोडके यांनी या ऑनलाईन समारंभाच्या कार्यक्रमाची उद्देशिका सर्वांना सांगितली. तसेच व्याख्याते त्यांचा परिचय व सर्वांचे स्वागत त्यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात व्यक्त केले. अतिथींच्या सुंदर मनोगता नंतर डॉ. संदीप घोडके यांनी उपस्थितां द्वारे राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे मतदार प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली " मतदार जागृती सप्ताह " कार्यक्रमांची आखणी झाली होती. 

समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. साहेबराव ओहोळ यांनी गेले आठवडाभर नोडल ऑफिसर डॉ. संदीप घोडके यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले विविध कार्यक्रम , अतिथी व त्यांचा विषय यांचा खास उल्लेख केला. महाविद्यालयास भेट देण्यास आलेल्या अनेक कमीट्या त्यांनी या विभागाच्या अशा व विस्तार कार्याचे कौतुक केल्याचे आवर्जून नमूद केले. आणि भावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास महाले यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

सदरच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात दोन्ही महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने आभासी स्वरूपात उपस्थित होते.

गतसप्ताहात निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या निर्देशाप्रमाणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग द्वारे वक्तृत्व, निबंध, काव्य, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सालाबादप्रमाणे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने लोकशाही, निवडणूक प्रक्रिया व जागरूक मतदार यावर प्रश्न - उत्तरे , घोषवाक्य या स्पर्धा घेण्यात आल्या. सदरच्या या आठ विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक सदरच्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.कोकण (पनवेल) विभागीय उच्च शिक्षण सह संचालक डॉ. संजय जगताप, तहसीलदार खंदारे साहेब , नायब तहसीलदार म्हात्रे मॅडम व  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार यांनी सहभागी विद्यार्थी व आयोजकांचे प्रोत्साहनात्मक खास अभिनंदन केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

कुडाळच्या "बिलिमारो"ने जिंकले राज्यस्तरीय अटल करंडक