महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे रबाळे झोपडपट्टी मधील महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन
नवी मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन तर्फे रबाळे झोपडपट्टी मध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅड वाटप आणि आरोग्य मार्गदर्शन शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
प्रथम दर्शनी काही मोजक्या महिलांना समोर बोलावून त्यांना अगोदर स्यनिटरी पॅड वाटप करण्यात आले. त्यानंतर झोपडपट्टी मधील प्रत्येक घरामध्ये जाऊन सॅनिटरी पॅड वाटप रबाळे झोपडपट्टी मधील महिलांच्या हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी झोपडपट्टी मधील महिलांना आरोग्याच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शनही करण्यात आले. तसेच वैद्यकीय मदत कक्ष तर्फे राबवले जाणारे विविध सामाजिक उपक्रम यांची माहिती महिलांना देऊन शेवटी घरोघरी जाऊन महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.
यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि 'डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन'चे नवी मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक मंगेश मिस्कीन, स्वप्नील मढवी, अनिल शिंदे पाटील, सूरज नाईकरे, उपेश ओंबळे, गणेश मिस्कीन, विलास सावंत,भरत गोपाळे,सिद्धांत साळुंखे, मनीष हलगे, आनंद सलवदे उपस्थित होते.