पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाला ‘चॅम्पियनशिप’

पनवेल : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांमध्ये खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाला ‘रायगड जिल्हा विभागीय चॅम्पियनशिप’ जिंकण्याचा बहुमान मिळविला आहे. ऑनलाइन घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये सीकेटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग 17 वर्षे सर्वाधिक पारितोषिके प्राप्त करून देदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे.

दरवर्षी होणार्‍या या स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण 16 महाविद्यालये सहभागी झाली होती. नृत्य, अभिनय, साहित्य, फाईन आर्ट व संगीत या क्षेत्रांतील एकूण 15 वैयक्तिक प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. सीकेटी महाविद्यालयाने  सर्व स्पर्धा प्रकारामध्य भाग घेतला होता. त्यापैकी जाहीर झालेल्या 14 स्पर्धांच्या निकालांपैकी सीकेटी महाविद्यालयाने 13 पारितोषिके प्राप्त केली. त्यात पाच प्रथम क्रमांकाची, सहा द्वितीय क्रमांकाची आणि दोन तृतीय क्रमांकाची पारितोषिके आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे रबाळे झोपडपट्टी मधील महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन