महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
एसटी संपामुळे रायगड विभागात दररोज 32 लाखांचे नुकसान
पनवेल : एसटीच्या संपामुळे रायगड विभागाचे दररोज 32 लाखांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील आठ आगारात 859 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या रायगडमधील 92 बसेस रस्त्यावर धावत आहेत. लांब पल्ल्याच्या बहुतांश फेर्या बंद आहेत. एसटीचा प्रवास रडतखडत सुरू असून हळूहळू गाडी रुळावर येत आहे.
संपात अद्यापही सहभागी असलेल्या कर्मचार्यांचे परतीचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. अडीच हजार कर्मचार्यांपैकी 167 कर्मचार्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. तर 574 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 532 कर्मचार्यांना नोटीसा बजावण्यात अली आहे.
रायगड विभागातील महाड, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, अलिबाग, मुरूड, पेण आणि कर्जत या आठ आगारातील अडीच हजार कर्मचारी संपावर गेले होते. आजच्या घडीला जिल्ह्यात 859 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. त्यात महत्त्वाचा घटक असलेले 107 चालक आणि 137 वाहकांचा (कंडक्टर) समावेश आहे. या कर्मचार्यांना घेवून एसटीचा रडतखडत प्रवास सुरू आहे. सध्या रायगडमधील 92 बसेस रस्त्यावर धावत आहेत. लांब पल्ल्याच्या बहुतांश फेर्या बंद आहेत. मोजक्याच मुंबई आणि लोकल फेर्यांवर भर देण्यात आला आहे. दिवसभरात होणारे एक लाख किलोमीटरचे रनिंग आता अवघ्या 21 हजार किलोमीटरवर आले आहे. त्यातून एसटीला साडेआठ लाखांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे दररोज 32 लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.