सिडकोने अमन दूत मेट्रो स्थानकालगत च्या नाल्यावर  पादचारी पूल उभारावे - रहिवासीयांची मागणी  

खारघर: खारघर सेक्टर तीस ते चाळीस मधील नागरिकांना मेट्रोने प्रवास करता यावे यासाठी सिडकोने वसाहती लगत अमनदूत मेट्रो स्थानक उभारले आहे. मात्र स्थानक लगत मोठा नाला अडवा येत असल्यामुळे  नाल्यातून  मार्ग काढत स्थानक गाठायचे का असा प्रसन्न परिसरातील रहिवासीयांना पडला आहे. 
 
     बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर सिडकोने अकरा स्थानक उभारले आहे. त्यातील बहुतांश स्थानक वसाहती लगत असून प्रवाशांना स्थानकावर प्रवेश करण्यासाठी दोन्ही बाजूने सीडीची सोय करण्यातआली आहे. मात्र या मार्गावर असलेल्या एका बाजूला अमनदूत मेट्रो स्थानक मध्यभागी भल्ला मोठा नाला आणि दुसरीकडे जवळपास पन्नास हजार लोकवस्ती असलेले सेक्टर तीस ते चाळीस मधील लोकवस्ती आहे. येत्या काही दिवसात पेंधर ते खारघर सेंट्रल पार्क दरम्यान मेट्रो रेल्वे धावणार आहे. मात्र सेक्टर तीस ते चाळीस मधील नागरिकांना अमनदूत मेट्रो स्थानक गाठण्यासाठी नाल्यातून अथवा दहा ते पंधरा मिनिटे पायी चालत वळसा घालून मेट्रो स्थानक गाठावे लागणार आहे. सिडकोने मेट्रो स्थानक उभारताना स्थानक लगत असलेल्या  नाल्यावर पादचारी पूल उभारणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्यामुळे सेक्टर तीस ते चाळीस मधील  राहिवासियांमध्ये नाराजी पसरली आहे. सिडकोने रहिवासीयांची मागणी लक्षात घेवून पादचारी पूल उभारावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगर पालिकेच्या विभाग कार्यालयात अभ्यंगतांसाठी आसन व्यवस्थेचा अभाव