नवी मुंबई महानगर पालिकेच्या विभाग कार्यालयात अभ्यंगतांसाठी आसन व्यवस्थेचा अभाव

नवी मुंबई-: नवी मुंबई महानगर पालिकेच्या विभाग कार्यालयात नागरीकामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल असते. मात्र या कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना आसन व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहून प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अशा वेळी जेष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे अशा विभाग कार्यालयात नागरिकांसाठी आसन  व्यवस्था तयार करावी अशी मागणी होत आहे.

श्रीमंत महापालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा आज लौकिक आहे.आणि या लौकिकाला शोभेल अशीच  दौलत जादा कबरसात करून  मनपा मुख्यालयाची वास्तू उभारली आहे.त्यामुळे आज जरी या शहराचा गाडा हाकणारी वटवृक्षाप्रमाणे वास्तू असली तरी त्या वृक्षाच्या फांदयारुपी विभाग कार्यालयांची दयनीय अवस्था आहे.मनपाचे बहुतांश  विभाग कार्यालय हे स्वतंत्र इमारतीत नसून त्या ठिकाणी इतर मानपाचे कारभार चालतात,.तसेच वाहन पार्किंग ची देखील मोठी गैरसोय होत असते.आणि याच विभाग कार्यालयात नागरिकांची नागरी कामांसाठी मोठी रेलचेल असते.मात्र कामानिमित्त आलेल्या नागरीकांची या विभाग कार्यालयात मोठी हेलसांड होताना दिसत आहे. कारण या ठिकाणी आलेल्या अभ्यंगतांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने बराच वेळ नागरिकांना उभे राहावे लागते.आणि अशा वेळी जेष्ठ नागरीकांना याचा अधिक त्रास होतो.त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विभाग कार्यालयात नागरीकांना प्रतीक्षा करताना बसण्यासाठी आसन  व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीच्या वर्गास प्रत्यक्ष सुरूवात