रिक्षा संघटना तर्फे रिक्षा चालकांना मास्क वाटप

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील 'कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे जिल्हा आटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, नवी मुंबई आणि गावदेवी रिक्षा चालक-मालक संघटना' नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक लोकनेते आमदार  गणेश नाईक  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष, माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या उपस्थितीत  नेरुळ रेल्वे स्टेशन येथे मास्क वाटप कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्या हस्ते नेरुळ परिसरातील रिक्षा चालक, मालक, वाहतूक पोलीस अधिकारी तसेच स्टेशन वरील प्रवाशांना मोफत मास्क वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक शेखर भोपी, समाजसेवक नकुल म्हात्रे, समाजसेवक गणपत भोपी, समाजसेवक देवा म्हात्रे, समाजसेवक अक्षय पाटील, संघटनेचे सरचिटणीस विकास सुर्यवंशी, नवी मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न कडू, नवी मुंबई चिटणीस राजेश पाटील, नवी मुंबई आरटीओ प्रतिनिधी सचिन शेलार ,सोमनाथ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. 

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. त्यामुळे कोरोना संपला असे समजून लोकांनी मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त फिरण्यास, सोशल डिस्टन्सचे पालन न करण्यास सुरुवात केली. परंतु, आता अचानक कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन  करण्याची गरज आहे, असे नमूद करुन, 'रिक्षा चालकांनी देखील प्रवाशांना मास्क घालण्यास सांगावे किंवा मास्क न घातलेल्या प्रवाशांना मोफत मास्क द्यावा ', असे आवाहन यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेने पत्रा शेड बांधल्याने वाहतूक कोंडी