एपीएमसी मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेने पत्रा शेड बांधल्याने वाहतूक कोंडी 

नवी मुंबई : वाशी मधील एपीएमसी फ्रुट मार्केट गेट समोरील फ्रुट मार्केट ते भाजी मार्केट रोडच्या कडेला 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांनी धंदे करू नये याकरिता पत्र्याची शेड लावण्यात आली आहे. याशिवाय तेथे सुरक्षा रक्षकांचा पहार ही तैनात करण्यात  आला आहे. परंतु, या परिसराची पाहणी केल्यास सदर प्रकार म्हणजे नवी मुंबई महापालिकेने केलेला बनाव असल्याचे चित्र दिसत आहे.  दरम्यान, पंचक्रोशी चौकातील आरटीओ चौकी लगतच फ्रुट मार्केट चौक ते भाजी मार्केट शेड बांधण्यात आली असल्याने रस्ता ऐअरुंद होऊन ट्रॅफिक जाम होत आहे. याशिवाय ॲम्बुलन्स जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना काम करताना अडचण होत असून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. 

वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेस पत्रव्यवहार करून अडचण दूर करण्याची विनंती वारंवार करुनही महापालिकेने विनंतीस केराची टोपली दाखवली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेने शेड बांधली असली तरीही फेरीवाल्यांचे धंदे रस्त्याच्या कडेला लागलेले दिसूनच येत आहेत व नाममात्र अतिक्रमणाची गाडी रिकामी उभी केली जात आहे व सुरक्षा रक्षक बघ्याची भूमिका घेत बसले आहेत. सदर घटनेची दखल घेत 13-12-2021 रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने ते संस्थापक अध्यक्ष मा. राहुल भैया दुबाले यांच्या आदेशानुसार नवी मुंबई कार्यकारणीच्या शिष्टमंडळाच्या वतीनेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे 'डी' विभाग कार्यालयास निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळात नवी मुंबई शहराध्यक्ष मयूर कारंडे, महिला शहराध्यक्ष नवी मुंबई रुचिका करपे, शहर उपाध्यक्ष उमेश पाटील,  शहरसचिव प्रदीप कणसे, युवक शहराध्यक्ष गौरव धाये, युवक शहर सचिव विवेक पाटसकर, संपर्कप्रमुख अनंतराज गायकवाड आदींनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रशासनाने कानाडोळा केल्यास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला होता. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या नवी मुंबई महापालिकेने अद्याप कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली ते काटई नाका रस्त्याचा उपयोग नवी मुंबईकरांना होण्यासाठी एमएमआरडीए अधिका-यांसमवेत विशेष बैठक