महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
‘नैना’विरोधात शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न
पनवेल ः नैना प्रकल्प शेतकरी विरोधी असून भूमीपुत्रांचे थडगे बांधून विकासाचे मनोरे रचत असाल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक भूमीपुत्रांसोबत खांद्याला खांदा लावून लढू, असा इशारा ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
‘नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्कर्ष समिती’च्या वतीने वाकडी, स्वप्ननगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. या मेळाव्याला आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करायला मला मिळते हेच माझे भाग्य असून सदर लढाई भूमीपुत्रांच्या हक्काची आहे. आज येथील जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे सदरची जमीन पाहून कोणाच्या ताेंडाला पाणी सुटत असेल तर त्याची जीभ हासडून टाकायला देखील आम्ही मागे पडणार नाही. जर तुम्ही शेतकरी लढलात तर तुम्हाला कधी अपयश येणार नाही. आपल्याला एकजूट दाखवून लढा यशस्वी करायचा आहे, असे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
‘नैना’ने प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांवर अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी आज नैना विरोधात एकवटले. पनवेल परिसरात नैना विरोधाची आग धगधगत आहे. नैना म्हणजे केवळ बिल्डरांचा विकास असून शेतकऱ्यांना भकास करणारे आहेत. प्रकल्पग्रस्त, स्थानिक, भूमीपुत्रांना संपवण्याचाच प्रयत्न गेल्या काही वर्षापासून ‘नैना’कडून सुरू आहे. येत्या काळात होलिकेप्रमाणे ‘नैना’ देखील नेस्तनाबूद झाल्याशिवाय राहणार नाही. आज घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात ‘नैना’विरोधात प्रचंड संताप आहे. स्थानिकांचे म्हणणेच ऐकून घतले जात नाही. दडपशाही, हुकुमशाहीचे धोरण अवलंबले जात आहे. बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर लढ्याची भूमिका घतली पाहिजे. नैना प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा फायदा नसल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी म्हणाले. नैना नको, प्राधिकरण नको, आमच्या जमिनी आम्हाला परत द्या; आम्ही विकास करतो, असे जी. आर. पाटील यांनी सांगितले. प्रत्येक सरपंच, उपसरपंच यांची भेट घऊन त्यांचा नैनाला विरोध आहे की पाठिंबा आहे, ते समजेल असे राजेश केणी म्हणाले.
याप्रसंगी पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्र, ‘क्रांतिकारी सेवा संघा’चे अध्यक्ष नामदेव फडके, सुरेश ठाकूर, पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्र, नगरसेवक गणेश कडू, प्रज्योती म्हात्र, अनुराधा ठोकळ, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग, वामन शेळके, सुभाष भोपी, सुरेश पवार, राजेश केणी, अनिल ढवळे, नरेंद्र भोपी, नारायण पाटील, जगन फडके, सुदाम वाघमारे, बाळाराम फडके, डी. के. भोपी, बबन फडके, अनिल ढवळे, शेखर शेळके, सुरेश पाटील, रामचंद्र फुलोरे आदिंसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.