विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मागणीला यश

नवीन पनवेल : मागील सप्टेंबर महिन्यात अमरधाम स्मशानभूमी येथील रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या विद्युत पोलला एक कार धडकली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पालिका अधिकारी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली होती. व रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या धोकादायक विद्युत पोल हटवून भूमिगत करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार अमरधाम स्मशानभूमी येथील रस्त्यांच्या मधोमध असणारे विद्युत पोल हटविणार आहेत. 

            प्रभाग क्रमांक 18 सोबत पनवेल शहरांमधील इतर ठिकाणीही रस्त्याच्या मधोमध असणारे पोल संदर्भात तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना देखील विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना केले होते. पुढील दोन दिवसात रस्त्याच्या मधोमध असणारे विद्युत पोल हटविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

 
 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण न.पा.च्या बायो मायनिंग प्रकल्पाचे मुख्याधिकाऱ्यांनी केले उद्घाटन