महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
जयदीप पवार यांच्या गळ्यात मालमत्ता विभागाची अतिरिक्त माळ
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगर पालिकेच्या मालमत्ता सारख्या महत्वाच्या विभागाला १७ दिवस उलटून देखील उपायुक्त पदाची नेमणूक केली. नव्हती याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते आणि या वृत्ताची दखल घेत मनपा प्रशासनाने उद्यान विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांच्या गळ्यात मालमत्ता उपायुक्त पदाची अतिरिक्त माळ टाकण्यात आली आहे.
मालमत्ता विभागाचे उपायुक्त अशोक मढवी डिसेंबर अखेरीस निवृत्त झाल्यावर या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार या प्रतीक्षेत प्रभारी आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती. मात्र मनपाच्या आकृतीबंध मंजुरीनंतर देखील अधिकाऱ्यांची नेमणूक व पदोन्नती रखडली असताना रिक्त पदांवर अजुन काही अधिकारी नेमणुकीच्या प्रतीक्षेत आहेत मालमत्ता विभागाकडून संपूर्ण शहरातील मालमत्ता आणि तत्सम बाबींचा अभिलेख आणि सिडकोशी कागदोपत्री व्यवहार आदी नोंदी ठेवण्याचे सर्वात महत्वाचे काम केले जाते. विकास आराखडा आणि मालमत्ता निश्चित करून त्याची नोंद ठेवण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या या विभागाला १७ दिवस उलटून देखील उपायुक्त नेमला जात नसल्याने प्रशासकीय वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.तर सध्या मनपाच्या आस्थापानेतील मंजूर पदांपेक्षा सध्या फक्त तीन उपायुक्त असून तर प्रभारी सहा उपायुक्त आहेत.त्यामुळे प्रभारी उपायुक्तांनी पालिकेचा ताबा घेतला आहे. असे चित्र मनपा मुख्यालयात दिसत असताना मालमत्ता उपायुक्तची माकमत्ता उपायुक्त पदाची माळ आस्थापनातील उपयुक्तांच्या गळ्यात पडण्याऐवजी प्रभारी असलेले उपायुक्त जयदीप पवार यांच्या गळ्यात पडली आहे. तर याधी त्यांच्या कडे शिक्षण व उद्यान विभाग आहे.तर पवार यांना अतिरिक्त कारभार देण्यासोबतच वाहन व यांत्रिकी उपायुक्त मनोज कुमार महाले यांच्या कडे विष्णुदास भावे नाट्यगृह तर अनंत जाधव यांच्याकडे भांडार उपायुक्त पदाचा अतिरिक्त कारभार दिला आहे.