नाका कामगारांसाठी घणसोली येथे निवारा शेड बांधण्याची मागणी

नवी मुंबई : शिवसेना उपनेते विजय नाहटा  यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसेना बंजारा समाज नवी मुंबई जिल्हा महिला  प्रमुख शांताताई जाधव आणि शिवसैनिक तथा कामगार नेते बाळकृष्ण खोपडे - देशमुख यांनी  नाका कामगारांसाठी घणसोली येथे निवारा शेड बांधून देण्यात यावी, अशी मागणी महापालिका घणसोली विभाग अधिकारी महेंद्र ठोके यांच्याकडे १९ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिका  अभिजीत बांगर यांची प्रत्यक्ष भेट शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली घेतली असता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी  नाका कामगारांसाठी निवारा शेड बांधण्याची मागणी मान्य केली असून, विभाग अधिकारी यांनी जागेचा अहवाल पाठवावा म्हणून १९ जानेवारी रोजी कामगार नेते प्रदिप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना बंजारा समाज नवी मुंबई जिल्हा महिला प्रमुख शातांताई जाधव आणि शिवसैनिक बाळकृष्ण खोपडे-देशमुख यांनी महापालिका घणसोली विभाग अधिकारी महेंद्र ठोके यांना मागणीचे निवेदन सादर केले. 

यावेळी नाका कामगार सुरेश निकोसे, नियासा शेख, वीरबहाद्दूर जैस्वार, राज जैस्वार, प्रदीप पातोडे, वासुदेव आमझरे, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माहिती व जनसंपर्क विभागाबाबत मविआ राज्य सरकार उदासीन