महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
बेलपाडा येथील कोंक्रीट रस्त्याचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : गव्हाण जिल्ह्यापरिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या निधीतून आणि ग्रामपंचायत सदस्य शिल्पा किरण कडु यांच्या पाठपुराव्यामुळे बेलपाडा येथील स्मशानभूमी ते वलडेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन पनवेल महानगर पालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडले.
याप्रसंगी कोंग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थीती होती. याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील हे म्हणाले की, हा रस्ता आपण जिल्हा परिषद फंडातून करत असून बेलपाडा गावासाठी एक सुसज्ज स्मशानभूमी येत्या काही दिवसात मंजूर करून गावातील इतर नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करू याप्रसंगी उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, गव्हाण विभाग युवक अध्यक्ष किरण कडू, मधूशेठ पाटील, मा. सरपंच तुकाराम ठाकुर, शशी म्हात्रे, प्रविण कडू, मदन घरत, सुशांत घरत, प्रकाश कडू, किरण कडू, किरण म्हात्रे, दत्ता पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.