महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
नवी मुंबई : समाजकल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण अशा भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्वाधार योजनेद्वारे मागील ३ वर्षात सुमारे १५४० विद्यार्थ्यांना ८ कोटी ६ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील शासकीय वसतीगृहात प्रवेश घेणारे अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थी वसतीगृह प्रवेशाकरीता पात्र असूनही त्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाने सन २०१७ या वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. मुंबई विभागात सदर योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित असून मागील ३ वर्षातील या योजनेंतर्गत मुंबई विभागातील सुमारे १५४० विद्यार्थ्यांना ८ कोटी ६ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
मुंबई शहर जिल्हयात सुमारे ४३५ विद्यार्थ्यांना २ कोटी, मुंबई उपनगर जिल्हयात ४७० विद्यार्थ्यांना २ कोटी, ठाणे जिल्हयातील १८१ विद्यार्थ्यांना १ कोटी, पालघर जिल्हयात ४३ विद्यार्थ्यांना २३ लक्ष, रायगड जिल्हयात ९३ विद्यार्थ्यांना ६९ लक्ष, रत्नागिरी जिल्हयात २४४ विद्यार्थ्यांना ७७ लक्ष व सिंधुदूर्ग जिल्हयात ७४ विद्यार्थ्यांना २९ लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई विभागातील संबंधित जिह्यातील समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.