महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
वाशी सेक्टर १५,१६,१६ए मध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव राेखण्याची मागणी
नवी मुंबई-: वाशी सेक्टर १५,१६,१६ए मध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना साथरोगांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रभागातील सर्व रहिवाशी त्रस्त झाले आहेत. सदर डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासंदर्भात मनपाने आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी काँग्रेसचे वाशी ब्लॉक अध्यक्ष सचिन नाईक यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
संपूर्ण नवी मुंबईत डासांची उत्पत्ती वाढलेली आहे आणि डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना ताप, थंडी अश्या विविध प्रकारच्या साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.मनपा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या डासांची उत्पत्ती गटरनाल्यामध्ये होते आणि विभागातील नालेसफाईची कामे व्यवस्थित झाली नसल्यामुळे डासांची पैदास वाढलेली आहे त्यामुळे सदर कामाची चौकशी करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी लेखी मागणी काँग्रेसचे वाशी ब्लॉक अध्यक्ष सचिन नाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.