नवी मुंबईतील क्रीडांगणे खुली करण्याची पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची मागणी

नवी मुंबई : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या नावाखाली मनपाने शहरातील क्रीडांगणे खेळण्यासाठी बंद ठेवली असताना दुसरी कडे फिफा फुटबॉल स्पर्धेचे अयोजन शहरात केले जात आहे.त्यामुळे नवी मुंबईतील खेळाडूंवर अन्याय असून नवी मुंबईतील क्रीडांगणे खुली करून नवी मुंबईतील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली असून तसे न केल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा  दिला आहे.

कोरोनाचा आणि ओमीक्रोन या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. नवी मुंबई परिसरातील सर्व क्रीडांगणे बंद करण्याचे आदेश पालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.मात्र दुसऱ्या बाजूला महिला आशियाई करंडक फु़टबॉल स्पर्धेकरिता जोरदार तयारी केली जात आहे. आणि या सामन्यामध्ये भारता बाहेरून खेळाडू येत आहे. एकीकडे आपल्या पालिका हद्दीतील तरुणांना मैदानी खेळापासून वंचित ठेवून परदेशातून येणाऱ्या खेळाडूंना सर्व सुविधायुक्त मैदाने उपलब्ध करून दिली जात आहेत. महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपन्न होत असून याचे यजमान पद भूषविण्याचा मान जो आपल्याला मिळाला हे अभिमानास्पद आहेच. पण, त्यासोबत, नवी मुंबईतील क्रीडांगणे बंद करून नवी मुंबई शहरातील खेळाडूं - क्रीडाप्रेमीं यांना रोखलं जात आहे.

       नवी मुंबईतील सर्व क्रीडांगणे नियमावली देऊन सकाळी, दुपार आणि संध्याकाळ या तीन वेळेत सुरू ठेवण्यास मान्यता द्यावी आणि नवी मुंबईतील खेळाडूंना देखील प्रोत्साहन द्यावे. नवी मुंबई महापालिकेने  मैदानांना देखील आशियाई स्पर्धासाठी  ज्या प्रकारे सर्व सुविधायुक्त मैदाने उपलब्ध करून दिली जात आहेत.त्याच प्रकारे नवी मुंबईतील खेळाडूंना ही अशी मैदाने (क्रीडांगण) उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी  पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी  मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे.तसेच ही मैदाने खुली न त केल्यास  तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा  देखील  दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी सेक्टर १५,१६,१६ए मध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव राेखण्याची मागणी