महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मोहपेत ५० लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना
उरण : उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत मोहपे येथे साकारणाऱ्या ५० लाख रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आज (दि. १५) संपन्न झाला.
वास्तविक आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा करून हि योजना अंमलात आणली असताना त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न माजी आमदार मनोहर भोईर, आमदार बाळाराम पाटील यांनी केला. मात्र नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला असून येथील ग्रामस्थांनी केंद्र सरकार तसेच आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले.