कोन सावळा काँक्रटीकरण कामाची पाहणी

उरण  : उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून  केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत कोन-सावळे रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. या कामाची भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार काम करण्याची सूचना केली. यावेळी युवा नेते अविनाश गाताडे, अनिल पाटील, योगेश लहाने, महेंद्र गोजे, सतिश साठे, राजेश लबडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहित करणा-या विविध स्वच्छता स्पर्धांचा बक्षिस समारंभ संपन्न