एफ जी नाईक महाविद्यालयात

कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ.जी.नाईक महाविद्यालयात सांस्कृतिक समिती तर्फे " तरंग " या सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर उत्सवात ऑनलाइन मंचावरून पोस्टर मेकिंग, पेंटिंग आणि डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धा तसेच तसेच स्टँड अप कॉमेडी अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 
        सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य प्रताप महाडिक यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊन सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन व्यासपीठावरून होत असलेल्या विविध स्पर्धांमधील सहभागाबद्दल कौतुक केले तसेच सांस्कृतिक समितीचे व समितीतील सदस्यांचे देखील कौतुक केले. आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय विविध स्पर्धांचे आयोजन करत असते त्याचा विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोग करून घेतला पाहिजे असे देखील सांगितले.
विविध स्पर्धांसाठी परीक्षणाची जबाबदारी प्रा. समिधा पाटील,प्रा. पुष्पा मॅडम, रोहिणी मॅडम, प्रा.चिन्मय वैद्य, प्रा.उर्मिला रावरीया  ,योगेश सर , प्रा.संगीता वास्कर  तसेच जयश्री मोरे, प्रा.स्मृतिगंधा बिडकर ,कृष्णा पगारे  यांनी पार पडली    सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मोहपेत ५० लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना