बाजार समितीमुळे कांदा शेतकऱ्यांचे वीस लाख एक्केचाळीस हजार वसुल

नवी मुंबई-: कांदा बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्याचे कोरोनाकाळात निधन झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमामालाची रक्कम थकली होती. मात्र याप्रकरणी बाजार समितीने पाठपुरावा करत मयत व्यापाऱ्याच्या आप्तेष्टांकडुन शेतकऱ्यांना त्यांची थकीत रक्कम वसूल करून दिली आहे.

नवी मुंबईतील कांदा बटाटा बाजार आवारात चांदवड जि.नाशिक व पारनेर जि.अहमदनगर येथील एकूण २७ शेतकऱ्यांनी त्यांनी उत्पादित केलेला कांदा हा शेतमाल मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केट येथे विक्रिसाठी मे. कादरी ट्रेडिंग कंपनी गाळा क्र. ई-९९ यांचेकडे पाठविण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत सदर कंपनीचे चालक इस्लाम इस्माईल इद्रिसी यांचे कोरोना कालावधीत निधन झालेले असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी यांनी बाजार समितीकडे कांदा शेतमाल विक्रिची रक्कम मिळणेबाबत विनंती केली होती. याबाबत बाजार समितीमार्फत संचालक  अशोक देवराम वाळुंज तसेच मालक यांच्या वतीने त्यांचे आप्तेष्ट प्रतिष्ठित व्यापारी  नसीमभाई सिध्दीकी, बाजार आवाराचे उपसचिव विठ्ठल राठोड,  बाळासाहेब टाव्हरे, यांनी रक्कम वसुल करणेकामी पाठपुरावा केला. त्यामुळे. दिनांक १३.१.२०२१ रोजी शेतमाल विक्रिची रक्कम रुपये वीस लाख एक्केचाळीस हजार रुपयाचे धनादेश बाजार समितीचे प्र. सचिव प्रकाश अष्टेकर यांचे हस्ते  बाळू पुंजाराम जामदार व इतर शेतकरी चांदवड जि.नाशिक तसेच मोहसीन अख्तार पठाण, पारनेर, जि. अहमदनगर यांना सुपूर्द करण्यात आले. याबाबत संबंधित उपस्थित शेतकऱ्यांनी धनादेश मिळाल्यानंतर बाजार समितीचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी पादचारी पूल वादाच्या भोवऱ्यात ?